Premium|Doctor on a Warfront Book : युद्धभूमीवर डॉक्टरांची मानवतेची लढाई; ‘डॉक्टर ऑन अ वॉरफ्रंट’मधून समोर येते युद्धाची भयावह कहाणी

A Doctor’s Journey Through War Zones : युद्धभूमीवर गोळ्यांच्या आवाजात जखमींचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांची ही कहाणी युद्धाच्या भयावहतेसोबतच मानवतेची, सेवाभावाची आणि सीमांच्या पलीकडे जाऊन मदत करण्याची ताकद प्रभावीपणे दाखवते.
Doctor on a Warfront Book

Doctor on a Warfront Book

esakal

Updated on

स्वाती दामले

डॉक्टर ऑन अ वॉरफ्रंट या पुस्तकातून युद्धामुळे भरडल्या जाणाऱ्या जनतेची केविलवाणी, दयनीय आणि हृदयद्रावक परिस्थिती डोळ्यांसमोर उभी राहते. ‘युद्धस्य कथा रम्या’ असे कितीही म्हटले गेले तरी प्रत्यक्षात त्या अत्यंत भीषण आणि विदारक असतात, हे पुस्तक वाचताना ठायी ठायी जाणवत राहते. पुस्तकातील छायाचित्रांमुळे युद्धाच्या परिणामांची भयानकता वाचकाला अंतर्मुख करते.

रणांगणावरील पराक्रमाच्या रोमांचकारी आणि चित्तथरारक कथा सर्वांनाच आवडतात. या कथा वाचून वाचक भारावूनही जातात. परंतु युद्धभूमीवरील सर्वच कथा फक्त युद्धाशीच संबंधित असतात असे नाही, तर त्याही पलीकडे युद्धाशी निगडित इतर क्षेत्रांमध्ये निडरपणे काम करणारे, मानवतेच्या दृष्टिकोनातून आपली सेवा देणारेही स्त्री-पुरुष असतात. डॉक्टर ऑन अ वॉरफ्रंट हे पुस्तक म्हणजे अशाच युद्धभूमीवर दिल्या गेलेल्या वैद्यकीय सेवेची गाथाच आहे. या पुस्तकाचे लेखक डॉ. भरत केळकर यांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन ही सेवा देण्याची संधी मिळाली. तेथील दाहक परिस्थिती त्यांनी अनुभवली आहे. सेवा करत असताना लोकांच्या उद्ध्वस्त झालेल्या मनांपर्यंत त्यांना पोहोचता आले. त्यांचे हे पुस्तक त्याच अनुभवांवर आधारित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com