विक्रांत देशमुख
श्वानांचे मानसशास्त्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहे का? त्याच्याशी नाते अधिक दृढ करायचे आहे का? मग लक्षात ठेवा, आपल्या श्वानाच्या वर्तनाचा अर्थ लावणे हे खूप कठीण काम असू शकते. हा लेख श्वानाच्या मनोविश्वाचा अर्थ लावण्यास आणि तुमच्या नात्यातील सुसंवाद वाढवण्यास नक्कीच मदत करेल.
श्वान हा विलक्षण बुद्धिमान प्राणी आहे. अर्थात, त्याच्या बुद्धिमत्तेची मानवांशी तुलना करता येत नाही, हेही तितकेच खरे. मात्र आपण अनेकदा या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतो. आपण पाळीव प्राण्यांचे ‘मानवीकरण’ करतो. याचे काहीवेळा घातक परिणाम होऊ शकतात. अशा तकलादू मानव-श्वान नात्याचा परिणाम श्वानाच्या मूडवरही होतो. उदाहरणार्थ, त्यांच्यामध्ये आक्रमकता किंवा हट्टीपणा दिसून येतो.