अंजली ढमाळ
दलितांचे शोषण, स्त्रियांची शोषित स्थिती, त्यावरचे डॉ. बाबासाहेबांचे मूलगामी चिंतन असे प्रश्न नाट्यप्रयोगातून मांडताना युगानुयुगे तूच या मूळ दीर्घकवितेचा स्वर अधिक गहिरा आणि बहुमितीय झाला आहे, याचा प्रत्यय हा प्रयोग पाहताना येतो.
कला हे माध्यम मनोरंजनासाठी असतेच, पण त्याहीपेक्षा अधिक ते ‘स्व’ला यथार्थपणे अभिव्यक्त करण्याचे माध्यम असते आणि समाजाशी थेटपणे संवाद साधण्याचं सर्वात प्रभावी साधन असते, याचा प्रत्यय नुकताच युगानुयुगे तूच हा एक गंभीर आणि अंतर्मुख करणारा नाट्यप्रयोग पाहताना आला.