Premium|Babasaheb Ambedkar writings : समाजाला नवी दिशा देणारा बौद्धिक वारसा! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनातील विवेक आणि नैतिकतेचे महत्त्व आजही किती आहे?

Intellectual legacy of Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अराजकीय साहित्य त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे. धर्म, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्रावरील त्यांचे सखोल लेखन भारतीय बौद्धिक परंपरेचा अनमोल वारसा असून, ते आजही समाजाला विवेक आणि समतेची नवी दिशा देत आहे.
Intellectual legacy of Babasaheb Ambedkar

Intellectual legacy of Babasaheb Ambedkar

esakal

Updated on

डॉ. बाबासाहेब कांबळे

डॉ. आंबेडकरांचे अराजकीय साहित्य हे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे. त्यांनी केवळ राजकारणातच नव्हे, तर साहित्य, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या लेखनातून समाजाला नवी दिशा मिळाली, आजही मिळते. त्यांच्या लेखनातील समाजात विवेक, समता, नैतिकता आणि मानवता यांना सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे आंबेडकरांचे हे साहित्य आजही तितकेच महत्त्वाचे आणि प्रेरणादायी आहे.

भारतीय इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान केवळ राजकीय नेते म्हणून मर्यादित नाही, तर ते एक महान विचारवंत, तत्त्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि लेखक होते. त्यांच्या कार्याचा अभ्यास करताना बहुतेक वेळा त्यांच्या राजकीय योगदानावर भर दिला जातो, परंतु त्यांच्या अराजकीय साहित्यिक योगदानाकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही. आंबेडकरांचे लेखन विविध विषयांवर आधारित असून ते लेखन धर्म, तत्त्वज्ञान, समाजरचना, शिक्षण, नैतिकता आणि मानवी मूल्ये यांचा सखोल अभ्यास म्हणून गणले जाते. त्यामुळे त्यांचे अराजकीय साहित्य हे भारतीय बौद्धिक परंपरेतील एक महत्त्वपूर्ण वारसा मानले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचा अभ्यास करताना असे लक्षात येते, की त्यांचे विपुल लेखन उपलब्ध आहे. त्याचा आढावा घेतल्यास, त्यांचे लेखन समतेच्या आणि न्यायाच्या हक्कांसाठी होते, याची आपल्याला प्रकर्षाने जाणीव होते. मुळात साहित्याचे राजकीय आणि अराजकीय असे वर्गीकरण करताच येत नाही, कारण प्रत्येक साहित्याच्या पाठीमागे एक राजकीय उद्देश असतोच, तो उघडपणे ज्याला आज आपण राजकारण समजतो त्याच्याशी निगडित नसले, तरी अप्रत्यक्षपणे प्रत्येक साहित्य राजकीयच असते, असे वाटते. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याची राजकीय आणि अराजकीय अशी विभागणी करायची झाली, तर त्यांच्या अराजकीय साहित्याबद्दल जास्त चर्चा झालेली दिसत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

What is Ambedkar scholarship Maharashtra?
From Maharashtra to Germany: Ambedkarite Values Go Global
'आंबेगाव भूषण' पुरस्कार स्वीकारणारे मान्यवर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि उपस्थित भीमसागर
Dr. Babasaheb Ambedkar
Marathi News Esakal
www.esakal.com