Premium|Science of Fragrance and Smell : सुगंधाचे शास्त्र; गंधाच्या रहस्यांचा शोध

Synthetic and Natural Perfumes : सुगंधाचे गुंतागुंतीचे शास्त्र, त्याचे निष्कर्ष काढण्याच्या विविध पद्धती आणि आधुनिक संशोधनातील गंधद्रव्यांचे वाढते महत्त्व यावर डॉ. जयंत गाडगीळ यांनी प्रकाश टाकला आहे.
Science of Fragrance and Smell

Science of Fragrance and Smell

esakal

Updated on

गंध कसा जाणवतो? तो कोणत्या इंद्रियांना जाणवतो? तो माणसाच्या नाकाला जाणवतो हे माहिती असते, पण किड्यांना नाक नसते, तर त्यांना तो कसा जाणवतो? सापाला तो जिभेने जाणवतो का? मेंदूला तो कसा कळतो? तो कुत्र्यासारख्या प्राण्यांच्या लक्षात कसा राहतो? या सगळ्याचे खूप गुंतागुंतीचे शास्त्र आहे.

सुगंधी द्रव्याचा इतिहास खूप जुना आहे. त्याच्या शास्त्रीय माहितीलासुद्धा मोठी परंपरा आहे. एकेकाळी बेन्झीन नावाचे एक रसायन औद्योगिक द्रावक (सॉल्व्हंट) म्हणून वापरात होते. त्याच्या कर्करोगकारी गुणधर्मामुळे त्याच्या वापरावर बंदी आली. गोडसर वासाचे हे द्रव दहाव्या शतकात अरबी व्यापाऱ्यांना जावा बेटांवरील झाडाच्या राळेमध्ये आढळले. जावा बेटावरील सुगंध या अर्थी त्याचे अरबी नाव पडले ‘बेन जावीन’. त्या नावाचे युरोपीय भाषांमध्ये रूपांतरण बेन्झीन असे झाले.

सुगंधी द्रव्याचे केवळ अत्तरे, सेंट, सौंदर्यप्रसाधने तयार करणे एवढेच उपयोग नाहीत, तर खाद्यपदार्थ टिकवणे, कपड्यांना, कागदांना, किडे-कसर लागण्यापासून रोखणे, व्यक्तींच्या मानसिक अवस्थेत इष्ट बदल घडवणे, असे अनेक उपयोग असतात. सुमारे शंभर वर्षांपूर्वी १९२७मध्ये एक शोधनिबंध प्रकाशित झाला होता. (1) त्यात सुगंधी द्रव्यांमुळे जंतूंचा प्रसार रोखता येतो, विशिष्ट असे सुगंधी पदार्थ हवेत असतील तर हवेद्वारे पसरणारा आजार होण्याची शक्यता कमी होते, असे म्हटले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com