

Parkinson's Disease Awareness Book
esakal
पार्किन्सन्सवर बोलू काही हे पुस्तक वाचून मेडिकल क्षेत्राशी ओळख नसेल तरी वाचकाला या रोगाची माहिती व्यवस्थित समजते. डॉ क्षमा वळसंगकर कविमनाच्या असल्यामुळे त्यांनी रोग समजून घेतलाच, पण त्यासोबत रुग्णाच्या भावनाही समजून घेतल्या आहेत. त्यांचे हे पुस्तक पार्किन्सन्स झालेल्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणारे आहे.
पा र्किन्सन्सवर बोलू काही हे डॉ. क्षमा वळसंगकर यांचे पुस्तक वाचले. त्यातून असे लक्षात आले, की काही आजार असे असतात, जे लगेच गंभीर स्वरूप धारण करत नाहीत. ते हळूहळू गंभीर होत जातात. परंतु त्या आजारांमुळे रुग्णाबरोबरच कुटुंबालाही एक प्रकारची अस्वस्थता जाणवत राहते. अशा आजाराविषयी लोकांना फारशी माहिती नसते. अर्धांगवायू किंवा ब्रेन हॅमरेजसारखा हा आजार अंथरुणाला खिळवून ठेवत नाही, किंवा त्यासाठी ऑपरेशनही करता येत नाही. त्या आजाराला बरोबर घेऊनच जगावे लागते. असे जगताना येणाऱ्या अनंत अडचणी, समस्या, त्यावरचे उपाय याविषयीचा विचारविमर्ष डॉ. क्षमा वळसंगकर त्यांच्या पार्किन्सन्सवर बोलू काही या पुस्तकात आहे.