
प्रतिनिधी
डेप्युटी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (मेडिकल) या पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या आणि देशातील तिसऱ्या महिला अशी ओळख असणाऱ्या लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, (निवृत्त) पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, यांनी लष्करी, वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यक्षमतेने आणि कर्तृत्वाने विशेष ठसा उमटविला आहे. आता त्या नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डॉ. कानिटकर यांच्याशी साधलेला खास संवाद...