Dr. Nandakumar Joshi
Dr. Nandakumar Joshisakal

Premium|Dr. Nandakumar Joshi: तबल्याच्या तालाने तोल सांभाळणारे डॉक्टर

कोल्हापूरातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. नंदकुमार जोशी वयाच्या ८४व्या वर्षीही तबलावादन करत आहेत. त्यांनी बालवयात जपलेला हा छंद आजही त्यांच्या आयुष्यात तल्लीनतेने वाजतो.
Published on

आयुष्यात एखादा तरी छंद जोपासावा, असे आपण नेहमी ऐकतो. शालेय वयात, महाविद्यालयीन शिक्षण घेईपर्यंत छंद जोपासण्याचा प्रयत्न अगदी नेटाने केला जातो. तारुण्य संपताना, प्रौढावस्थेत प्रवेश करताना जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली माणसाचा छंद दबून जातो. वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे छंदाला ब्रेक लागल्यावर एकूणच जगण्याचा ताल काहीसा बिघडतो, ताण वाढतो. काहीजण मात्र कटाक्षाने छंदासाठी वेळ काढतात. तबल्याच्या तालाशी बालवयात जमवलेली गट्टी अगदी आजही निगुतीने जपणारे कोल्हापुरातील नावाजलेले मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. नंदकुमार जोशी आज वयाच्या ८४व्या वर्षीही तेवढ्याच तल्लीनतेने तबलावादन करताहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com