डाॅ. श्रीकांत गबाले
डिजिटल युगात ड्रोन अत्याधुनिक तंत्रज्ञानातील प्रभावी माध्यम ठरत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने भूभागाचा अभ्यास, शेती व्यवस्थापन, पर्यावरण निरीक्षण, नगररचना, सुरक्षा व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये अचूक, प्रभावी आणि कार्यक्षम फोटोग्राफी करता येते. त्यामुळे निर्णयप्रक्रिया अधिक वैज्ञानिक, माहितीपूर्ण आणि वेगवान होत आहे.
ड्रोन फोटोग्राफी ही कमी किंवा जास्त उंचीवरून, विशेषतः स्थानिक पातळीवर, अत्यंत उच्च रेझोल्युशनमध्ये प्रतिमा घेण्याची पद्धत आहे. ड्रोनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची लवचिकता, अचूक नियंत्रित उड्डाण क्षमता आणि वेळोवेळी विशिष्ट ठिकाणांहून प्रतिमा मिळवण्याची सोय. त्यामुळे शेतीतील पीक आरोग्य निरीक्षण, कीटकनाशक फवारणी, बांधकाम प्रगतीचे निरीक्षण, सर्वेक्षण, आपत्ती काळातील शोधकार्य, तसेच विवाह समारंभांसारख्या कार्यक्रमांचे छायाचित्रण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोन अत्यंत उपयोगी ठरतो.