Premium|Konkan bird photography : छोट्या खंड्याची संस्मरणीय साथ; कोकणातील नदीकाठी दीड तासांची ‘एक्सक्लुझिव्ह’ फोटोग्राफी

Bird watching in Kokan resorts : गुहागरच्या निसर्गरम्य परिसरात नदीकाठी पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या पर्यटकांना 'छोटा खंड्या' या देखण्या पक्ष्याचे तासभर दर्शन घडले असून, त्याच्या चपळ हालचाली आणि मासेमारीच्या कसरती कॅमेऱ्यात टिपण्याचा एक 'एक्सक्लुझिव्ह' अनुभव या लेखातून उलगडतो.
 Exclusive 90-minute common kingfisher photography by hobbyist photographer

Exclusive 90-minute common kingfisher photography by hobbyist photographer

esakal

Updated on

शेखर ओढेकर

त्या दीडेक तासात आम्ही तिघे आणि छोटा खंड्या एवढेच तिथे होतो. खरोखरच हा एक विलक्षण अनुभव होता. आम्ही पक्षी निरीक्षण आणि छायाचित्रणासाठी अनेक ठिकाणी फिरत असतो, परंतु असा अनुभव आम्हाला कधीच आला नव्हता. इतकी ‘एक्सक्लुझिव्ह’ फोटोग्राफी प्रथमच करायला मिळाली. एका छोट्याशा, सुंदर आणि देखण्या पक्ष्याने आम्हाला अक्षरशः खिळवून ठेवले होते.

मध्यंतरी कोकणभ्रमंती केली. तशी खूप भटकंती न करता फक्त दापोली आणि गुहागर येथेच मुक्काम केला. दापोली मुक्कामानंत गुहागर येथे बुकिंग केलेल्या रिसॉर्टमध्ये उतरलो. संपूर्ण रिसॉर्ट परिसरात फेरफटका मारला. परिसर तसा मोठाच; दोन-तीन एकर असावा... विविध प्रकारची झाडे, फुले, हिरवळ... छानपैकी सजला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिसॉर्टच्या बाजूला नदी होती. नदीचे पात्र तसे मोठे नव्हते, पण लांब होते. रिसॉर्ट उंचीवर होते आणि नदीपात्र बरेच खाली होते, त्यामुळे उंचीवरून नदीपात्राचा संपूर्ण परिसर व्यवस्थित दिसत होता. नदीला बऱ्यापैकी पाणी होते, दोन्हीही बाजूला खडक, त्यापलीकडे लाल मातीच्या वाटा आणि त्याहीपलीकडे दाट झाडी! परिसर अतिशय शांत दिसत होता. साहजिकच दुसऱ्या दिवशी सकाळी त्या भागात भटकंती करण्याचे निश्चित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com