

Adolescent Brain Development
esakal
किशोरावस्थेत बदलणाऱ्या मेंदूला सारखी उत्तेजनांची गरज असते. पाच-दहा टक्के हुशार, अभ्यासू मुलांना अभ्यासातून, गणिते सोडवण्यातून, वाचनातून उत्तेजना मिळू शकते. पण सर्वसाधारण किशोरवयीन मुले सतत नव्या उत्तेजनांच्या शोधात असतात. योग्य दिशा मिळाली तर काही मुले क्रीडांगणावर, गिरिभ्रमणातून, साहसी खेळांतून नियंत्रित पद्धतीने ही उत्तेजना मिळवतात. पण दुर्दैवाने सध्याची पिढी ही उत्तेजना मोबाईलच्या माध्यमातून मिळवते.
नुकतीच एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली. पक्ष्याचे एक पिल्लू घरट्याबाहेर पडून उडण्याचा प्रयत्न करत होते, सारखे धडपडत होते. धडपडले की आजूबाजूच्या पक्ष्यांचे आवाज एकदम वाढायचे. बऱ्याच प्रयत्नाने अखेर त्या पिल्लाने एक छानशी भरारी घेतली आणि आश्चर्य म्हणजे पक्ष्यांचा कोलाहल आपसूकच थांबला!