Umbartha filmEsakal
साप्ताहिक
Editing सॉफ्टवेअरमुळे कोणी व्हिडीओ एडिटर होऊ शकत नाही, हे सहा नियम लक्षात ठेवा
उंबरठा, सिंहासन या चित्रपटांकडे संकलकाच्या दृष्टीने बघितल्यास संकलनाचे महत्त्व लक्षात येते
सुहास किर्लोस्कर
वेगवेगळ्या शॉटचे तुकडे जोडून एक कथा तयार करणे ही कला आहे. फक्त एडिटिंगचे सॉफ्टवेअर असल्यामुळे कोणी एडिटर होऊ शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे दृक-श्राव्य माध्यमातून गोष्ट सांगण्याची हातोटी असावी लागते आणि दिग्दर्शकाच्या विचारधारेशी – संकल्पनेशी जुळवून घेण्याचे तंत्रही आत्मसात करावे लागते.