कोणत्याही शिक्षणक्रांतीचं मूळ हे त्या काळाच्या सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक गरजांशी जुळलेलं असतं. ‘गुरूंची आज्ञा आणि शिष्याचे आज्ञा पालन’ या पारंपरिक शिक्षणपद्धतीपासून ‘गुरू आणि शिष्य दोघेही एकत्र नवीन गोष्टी शिकत आहेत’ या नवसंस्कृतीपर्यंतचा शिक्षणाचा प्रवास तंत्रज्ञानामुळे शक्य झाला. ‘बदलाची प्रक्रिया’ असं म्हणण्याइतकं त्याचं स्वरूप मर्यादित नाही. हा शिक्षण क्षेत्रातील उत्क्रांतीचा दस्तावेज आहे.