

Eggless dessert recipes
esakal
आंब्याचे चीजकेक मूस
(अंड्याशिवाय, नो-बेक रेसिपी)
साहित्य
पाऊण कप हेवी व्हिप्ड क्रीम, २५० ग्रॅम क्रीम चीज, अर्धा कप आंब्याची प्युरी/रस, १ कप पिठीसाखर, बारीक तुकडे केलेला १ आंबा, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, चिमूटभर वेलची पूड.
कृती
एका थंड बाऊलमध्ये हेवी व्हिप्ड क्रीम आणि एक तृतीयांश कप पिठीसाखर एकत्र करून ती घट्ट होईपर्यंत फेटून घ्यावी. मग हे मिश्रण थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे.
दुसऱ्या एका मोठ्या बाऊलमध्ये क्रीम चीज, आंब्याची प्युरी आणि उरलेली पिठीसाखर एकत्र करून ते मिश्रण पूर्णपणे मऊ आणि एकजीव होईपर्यंत फेटून घ्यावे. आता फेटलेले क्रीम अतिशय हलक्या हाताने आंब्याच्या मिश्रणात मिक्स करावे.
ग्लासच्या तळाला थोडे आंब्याचे तुकडे घालून त्यावर तयार केलेले मूस चमच्याने भरावे. मूस सेट होण्यासाठी किमान दोन तास किंवा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवावे. सर्व्ह करण्यापूर्वी वरून आंब्याचे थोडे आणखी तुकडे घालून सजवावे.