Premium|Volunteerism and brain health : स्वयंसेवा आणि मेंदूचे आरोग्य; समाजासाठी काम केल्यानेच स्वतःचं आयुष्य, आनंद आणि मेंदूची कार्यक्षमता कशी वाढते?

Volunteering Benefits : स्वयंसेवा केवळ समाजासाठीच नव्हे, तर स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही वरदान ठरत असून, छोट्या कृतीतून समाजभान जपण्याचा मंत्र या लेखातून मांडण्यात आला आहे.
Volunteerism and brain health

Volunteerism and brain health

esakal

Updated on

विद्या हर्डीकर-सप्रे

खरंतर स्वयंसेवेला कोणत्याही कक्षा नाहीत. आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार कोणत्याही स्तरावर काम करता येतं. कुटुंब, आजूबाजूचे मराठी अथवा भारतीय, भारताबाहेर असाल तर तिथले अभारतीय, जगभरातले लोक यांच्यासाठी स्वतंत्रपणे अथवा स्वयंसेवी संस्थेबरोबर काम करता येतं. संस्थेबरोबर काम करण्याचे पुष्कळ फायदे असतात.

आयुष्याचा पूर्वरंग असो की उत्तररंग, स्वतःपलीकडे जाऊन जे दुसऱ्यांसाठी काहीतरी करतात, त्यांच्या मेंदूचा विकास चांगला होतो आणि त्यांचे आयुष्य, आरोग्य वाढते हे आता शास्त्रसिद्ध झाले आहे. ‘Making Social connections, going beyond yourself and doing social services enhances the brain plasticity and overall it is good for brain health!’ याचा अर्थ, आपण दुसऱ्यांसाठी जे काही करतो ते शेवटी आपल्या भल्यासाठीच असतं. म्हणूनच ‘व्हॉलेंटिअरिझम’ या शब्दाला मराठीत सुंदर प्रतिशब्द आहे, ‘स्वयंसेवा’! सेवाभाव माणसाला नम्र करतो. समाजऋणाचा अर्थ सांगतो आणि समाजभान जागृत करतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com