home buying
Esakal
लक्षात ठेवा, सोयी तितक्या गैरसोयी असतात. ऑनलाइन किंवा कुठलीही वस्तू विकत घेताना तारतम्य आणि खबरदारी बाळगणे आणि मोहास बळी न पडणे हे आपल्याच हातात आहे.
प्रॉपर्टी /मिळकतीचे सामन्यपणे दोन प्रकारांत वर्गीकरण होते - स्थावर (Immovable) मिळकत आणि जंगम (Movable) मिळकत. स्थावर मिळकतीमध्ये आपले घर, फ्लॅट, दुकान, जमीन, बंगला इत्यादींचा समावेश होतो. तर, जंगम मिळकतीमध्ये आपल्या वस्तू, पैसे, दागदागिने, शेअर, गुंतवणुकी अशा गोष्टींचा समावेश होतो. या सर्व गोष्टी घेण्यासाठी काहीतरी किंमत (पैसे) द्यावी लगते आणि त्यामध्ये आपली फसवणूक होऊ नये याची जबाबदारी आपल्यावरच असते.
स्वतःचे घर असावे अशी बहुतेक सगळ्यांचीच आकांक्षा असते आणि त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. सध्याच्या काळात वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध जागा ह्यांचे प्रमाण व्यस्त झाले आहे आणि पर्यायाने किमतींत वाढ झाली आहे. आपल्या कष्टाच्या पैशातून घेतलेले घराचे स्वप्न निर्वेधपणे पूर्ण व्हावे आणि आपली फसवणूक होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. कुठलीही जागा विकत घेताना करारनामा करणे गरजेचे असते आणि काही वादविवाद झाल्यास त्यातील अटी आणि शर्ती खूप महत्त्वाच्या ठरतात. मिळकत कुठल्याही स्वरूपाची असो, ‘अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा । अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ।।’ हे समर्थवचन कायम लक्षात ठेवा. कुठलीही स्थावर मिळकत घेताना खालील बाबी कायम लक्षात घ्याव्यात.