Premium|Personality types and happiness : व्यक्तिमत्त्वाच्या विविधतेतून आनंदाचा शोध; एकटेपण आणि समूहातील अनुभव

Psychology of individual joy : आनंद ही उपभोगण्याची वस्तू नसून अनुभवण्याची बाब आहे; व्यक्ती इंट्रोव्हर्ट असो वा एक्स्ट्रोव्हर्ट, स्वतःच्या स्वभावानुसार आनंदाचा स्वीकार करून जीवन अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवता येते, असा मौलिक संदेश या लेखातून दिला आहे.
Psychology of individual joy

Psychology of individual joy

esakal

Updated on

स्नेहल बाकरे

आनंद चित्रपटात एक खूप सुंदर डायलॉग आहे, ‘‘आनंद कभी मरा नहीं । आनंद कभी मरते नहीं ’’ कारण मुळात आनंद उपभोगण्याची वस्तू नसून ती अनुभवण्याची बाब आहे. त्यामुळे व्यक्तीच्या स्वभावानुसार जरी ज्याचा त्याचा आनंद वेगळा असला, आनंद साजरा करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी आनंदी असणं, आनंदाचा स्वीकार करता येणं महत्त्वाचं!

आ पल्या आजूबाजूच्या माणसांकडे पाहिलं की जाणवतं, आपण सगळे जणू एकाच वर्णमालेतून जन्मलो आहोत, आणि आपल्या शरीररचनेची अक्षरं म्हणजे आपले दोन हात, पाय, कान, एक मेंदू, हृदय, नाक... असे आपले अवयव जे सामान्यतः प्रत्येकाकडे सारखेच आहेत, पण तरीही त्यातून तयार होणारा माणूस मात्र अजिबात एकसारखा नाही. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळी खासियत पाहायला मिळते. कोणी उंच तर कोणी ठेंगणा, कोणी मितभाषी तर कोणी बडबडा. प्रत्येकाचा आवाज, स्वभाव, देहबोली, विचार करण्याची पद्धतही वेगळी असते. एकाच घरात वाढलेली किंबहुना एकाच आईच्या पोटी जन्मलेली भावंडं किती भिन्न असतात. कित्येकदा वरवर पाहता रंग-रूपानं सारख्या दिसणाऱ्या दोन जुळ्या मुलांमध्येही त्यांच्या सवयीत, आवडीनिवडी, स्वभावात कितीतरी फरक असतो. एखादा मस्तीखोर असतो, तर याउलट दुसरा मात्र शांत असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com