

Royal Arabic Attar
esakal
अरब जगतातील अत्तरे म्हणजे वाळवंटातील रूक्षतेतून उमललेला सुगंधांचा वारसा आहेत. त्या सुगंधात वाळवंटाची शांतता, राजवाड्यांची श्रीमंती आणि परंपरेचा आदर मिसळलेला आहे. अरबांचे सुगंधाशी असलेले नाते शब्दांत व्यक्त होणारे नसून, ती वाळवंटात दडलेली एक कोमल आठवण आहे, अलगद उलगडणारी आणि मनात दीर्घकाळ रेंगाळणारी...
राजे महाराजे, अरब शेख, अमीर आणि सुलतान एकमेकांना हिऱ्या-मोत्यांसारखी मौल्यवान व दुर्मीळ अत्तरे भेट देत असत. एकेकाळी अशी अत्तरे राजकीय आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीची माध्यमे होती. सामान्य जनतेला न मिळणारी महागडी, दुर्मीळ अत्तरे राजांसाठी राखीव असत व ती सोन्या-चांदीच्या सुंदर बाटल्यांत ठेवली जात.
अत्तर म्हणजे अरब जगतातील इतिहासाची, परंपरेची आणि संस्कृतीची सुगंधी ओळख आहे. त्यांच्याकडे सुगंधाला अनन्यसाधारण महत्त्व असून अत्तर हे त्यांच्या संस्कृतीमधील अविभाज्य घटक आहे. असे म्हटले जाते, की अरब जगतात अत्तराचा सुगंध दिसत नाही, पण तो क्षणाक्षणाला जाणवतो.