नरेंद्र जोशी
सोसायटीचा पुनर्विकास म्हटले की सोसायटी सभासदांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पुनर्विकास प्रक्रियेला ‘हो’ म्हणण्यापासून ते नव्या पुनर्विकसित घरात गृहप्रवेश करण्यापर्यंतचा प्रवास जेवढा मोठा असतो, तेवढाच गुंतागुंतीचाही असतो.
हा प्रवास सोसायटी सभासद, पदाधिकारी आणि विकसक यांच्यातील परस्पर विश्वासावर आधारलेला, कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि पारदर्शक असेल, तर सोपा व सुसह्य होऊ शकतो.
अनेक सोसायट्यांचा पुनर्विकास वर्षानुवर्षे रखडलेला आपण पाहिला असेल. अशा सर्व सोसायटी सभासद-पदाधिकारी व प्रसंगी विकसकांच्या मनातील निवडक प्रश्नांना सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ व राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिलेली उत्तरे...