Premium|London travel bucket list : लंडन बकेट लिस्ट पूर्ण; स्वामीनारायण मंदिरापासून शेक्सपिअरच्या गावापर्यंतचा अविस्मरणीय प्रवास

London tourism bucket list for Indian travelers : लंडनच्या प्रवासात शेक्सपिअरचा इतिहास, स्वामीनारायण मंदिराची सात्त्विकता आणि मादाम तुसाँमधील वॅक्स स्टॅच्यूचा थरार अनुभवत मैत्रिणींसोबत पूर्ण झालेली ही 'बकेट लिस्ट' पर्यटनाचा एक नवा आणि निवांत दृष्टिकोन मांडते.
London tourism bucket list for Indian travelers

London tourism bucket list for Indian travelers

esakal

Updated on

सुवर्णा चिटणीस

शेक्सपिअरचं लहानसं पण अतिशय देखणं घर अजूनही जपून ठेवलं आहे. तिथं रोमिओ ॲण्ड जुलिएट या नाटकाचा छोटेखानी प्रयोगही पाहिला. त्या गावात फिरताना आजूबाजूच्या आधुनिक दुकानांच्या, रस्त्यांवरच्या वर्दळीच्या पार्श्वभूमीवर शेक्सपिअरच्या काळाचा इतिहास जिवंत वाटत होता.

पूर्वी युरोप टूर करताना लंडन बघून झालं होतं, पण घाईघाईनं बघणं आणि निवांतपणे आपल्याला पाहिजे ते व पाहिजे तसं बघणं

यांच्यात खूप फरक असतो. त्यामुळे जेव्हा आम्ही मैत्रिणींनी लंडन व स्कॉटलंडला जायचं ठरवलं, तेव्हा पूर्वी न बघितलेली ठिकाणं यावेळी बघायचीच, हे पक्कं ठरलं होतं. म्हणजेच लंडनची माझी बकेट लिस्ट पूर्ण होणार ही आशा होती. अर्थात वेगवेगळ्या देशांत फिरताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, की प्रत्येक प्रवासात त्या ठिकाणाचं नवीन रूप दिसतं, नवीन अनुभव मिळतात आणि काहीतरी नवं शिकायला मिळतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com