

Fashion Bans
esakal
आदित्य कात्रे
फॅशन ही पूर्वीपासून आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. आज फॅशनविश्वात
अनेक वेगवेगळे प्रयोग होतात, तसे पूर्वीही झाले. त्यातले काही प्रयोग लोकप्रिय झाले, तर काही प्रयोगांमुळे काही गोष्टींवर चक्क बंदी आली! इंटरनेटवर फेरफटका मारताना सापडलेल्या फॅशनविश्वातल्या
अजब गजब घडामोडी...
१. जांभळ्या रंगावर बंदी
प्राचीन रोम आणि मध्ययुगीन इंग्लंडमध्ये ‘टिरियन पर्पल’ या विशिष्ट रंगाच्या शेडचे कपडे वापरणं हा गुन्हा होता! ह्या रंगाचा डाय तयार करायला एवढा अवघड होता, की तो मोठ्या प्रमाणात तयार करणं अशक्य होतं. त्यामुळे हा रंग फक्त राजघराण्यांच्या कपड्यांमध्येच वापरला जाई, सामान्यांना तो रंग वापरण्यावर बंदी होती. कोणी या नियमाचं उल्लंघन केलंच, तर पार मृत्युदंडाची शिक्षादेखील होत असे!