
संपादकीय| धनं मूलमिदं जगत्?
काउंट लिओ टॉलस्टॉय. रशियन लेखक, तत्त्वज्ञ. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कुठेतरी असताना त्यानी एक प्रश्न विचारला. ‘अशी किती जमीन लागते एका माणसाला?’ माणसाच्या माणूसपणात अनुस्यूत असणाऱ्या मर्मावर बोट ठेवणाऱ्या या प्रश्नानं त्याकाळातल्या लेखक, तत्त्वज्ञांमध्ये एक चर्चा घडवून आणली होती. असाच आणखी एक प्रश्न. हादेखील अनेकांनी विचारलाय आजवर, आणि उत्तरंही दिली आहेत त्यावर अनेकांनी आजवर. ‘असा किती पैसा लागतो माणसाला?’