Storytelling: प्रथम पुरुषी...

First-person Narration: मला व्यक्तिशः आवडणारा प्रथम पुरुषी आवाज हा Joseph Conrad या महान लेखकाच्या Lord Jim या कादंबरीमधला. खुद्द लॉर्ड जिम हादेखील प्रथम पुरुषी निवेदक होऊ शकला असता. पण नाही! मार्लोच्या रूपानं कॉनरॅड कथाघटितांना अजून एक वेगळा चष्मा प्राप्त करून देतो.
first person narration in storytelling
first person narration in storytellingEsakal
Updated on

डॉ. आशुतोष जावडेकर

मुळात कुठल्याही लेखकाला आपलं लिंग ओलांडून पुरुष-स्त्री पात्रं उभी करणं हे अवघड (पण अपरिहार्य) असतं. पण विरुद्धलिंगी पात्राच्या प्रथम पुरुषी निवेदनासाठी तर मनोव्यापारांचा फार मोठा अभ्यास हवा.

लेखक आपल्याला गोष्ट सांगायला घेतो. तो लिहितो - हा हा माझा कथा-नायक. त्यानं असं असं केलं. ही माझी नायिका. ती अमुक चूक करून बसली. हा नायकाचा मित्र. त्यानं दगाबाजी करत नायकाची प्रेयसी आणि पैसे असं सगळं काबीज केलं. मग गोष्ट पुढे अशी अशी वाहत गेली. पण एखादा लेखक आपणा वाचकांना गोष्ट सांगायला बसतो आणि एकदम लिहितो - मी ना, हॉल्डेन.

न्यू यॉर्कमध्ये राहणारा सोळा वर्षांचा पोरटा! मला हरवल्यासारखं वाटतं आहे आणि माझे पालक तर त्यांच्या श्रीमंत जगात मश्गुल आहेत. पहिल्या लेखकानं गोष्ट तृतीय पुरुषी निवेदनाद्वारे सांगितली. दुसऱ्या गोष्टीत लेखक स्वतःच कथा नायकाचं पात्र होऊन ‘मी’ होऊन गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com