soup
soup esakal

Food Point : पावसाच्या दिवसात बनवा गरमागरम सूप..! शाही पनीर आणि यल्लो ग्रेव्हीही..

शाही पनीर, वाटाणा पुदिना सूप, बाजरी मिक्स चीला, ड्रमस्टिक सूप...

स्नेहा जोगळेकर

शाही पनीर

साहित्य

अडीचशे ग्रॅम पनीरचे (कॉटेज चीज) चौकोनी तुकडे, १ कप कांदा बारीक चिरून, १ कप टोमॅटो प्युरी, अर्धा कप भिजवलेले काजू, पाव कप फ्रेश क्रीम, पाव कप दही, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, १ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद पावडर, अर्धा टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून वेलची पूड, चवीनुसार मीठ, २ चमचे तूप किंवा तेल, गार्निशसाठी ताजी कोथिंबीर.

कृती

कढईत तूप किंवा तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा घालावा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतावा. आले-लसूण पेस्ट घालून १ मिनिट परतावे. टोमॅटो प्युरी, लाल तिखट, हळद, जिरे पूड घालून तेल सुटेपर्यंत शिजवावे. काजू पेस्ट, दही मिक्स करून २ ते ३ मिनिटे शिजवावे. पनीरचे चौकोनी तुकडे, गरम मसाला, वेलची पावडर आणि मीठ घालून हलक्या हाताने मिसळावे. ताजी मलई घालून नीट ढवळून घ्यावे आणि काही मिनिटे उकळू द्यावे आणि नंतर कोथिंबिरीने सजवावे.

टीप

चव वाढवण्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचे काही थेंब आणि चिमूटभर केशर घालू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com