Premium|Forced Labour : कायदे असूनही वेठबिगारी का थांबत नाही? सक्तीच्या मजुरीचे जागतिक वास्तव

Why Bonded Labour Still Exists : कायदे असूनही भ्रष्ट प्रशासन, कमकुवत अंमलबजावणी आणि राजकीय पाठराखणीमुळे वेठबिगारी कायम आहे. सक्तीच्या मजुरीतून होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार मानवी हक्क आणि न्याय्य अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हान ठरत आहे.
Why Bonded Labour Still Exists

Why Bonded Labour Still Exists

esakal

Updated on

सारंग खानापूरकर

वेठबिगारी हा केवळ आर्थिक पिळवणूक किंवा काही घटकांपुरता मर्यादित प्रश्‍न नाही, तर ती एक मोठी सामाजिक समस्या आहे. ही पद्धत बंद करण्यासाठी अनेक देशांनी कायदेही केले आहेत. परंतु, केवळ कायदे करून ही समस्या सुटलेली नाही. भ्रष्ट स्थानिक प्रशासन, कायद्याची सुस्त अंमलबजावणी आणि शोषकांची राजकीय पाठराखण यामुळे आजही ग्रामीण आणि असंघटित क्षेत्रात वेठबिगारी छुप्या पद्धतीने सुरूच असल्याचे दिसून येते.

जे देश सक्तीच्या मजुरीचा वापर करून उत्पादित केलेल्या मालाची निर्यात करून फायदा उकळतात, त्या देशांवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दंडात्मक आयात शुल्क लागू केल्याने सक्तीच्या मजुरीचा विषय चर्चेत आला आहे. ट्रम्प यांनी लागू केलेले आयातशुल्क बरोबर की चूक आहे, याची चर्चा होत असतानाच कर लादण्यामागील त्यांचा अंतस्थ हेतू वेगळा असल्याचा दावा केला जात असला, तरी त्यामुळे सक्तीच्या मजुरीच्या विषयाचे गांभीर्य कमी होत नाही. तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणामुळे जग जवळ आले असले, तरी ‘सक्तीच्या मजुरीचा वापर करून होत असलेला आंतरराष्ट्रीय व्यापार’ ही मानवी संस्कृतीवर उमटलेली एक मोठी काळी किनार ठरत आहे. जगभरातील कोट्यवधी लोकांना आजही त्यांच्या इच्छेविरुद्ध, अत्यंत कमी वेतनावर किंवा छळवणुकीला सामोरे जात विविध उत्पादन क्षेत्रांमध्ये सक्तीने काम करावे लागत आहे. ही परिस्थिती अनेक विकसनशील देशांमध्ये आहे. आधुनिक जगातील या गुलामीच्या व्यवस्थेमुळे मानवी हक्कांचे उल्लंघन तर होतेच, पण जागतिक अर्थव्यवस्थेतील न्याय्य व्यापारालाही सुरुंग लागतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर या समस्येचे मोठे पडसाद उमटत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com