

Perfume Intensity Guide
esakal
अलीकडे अत्तर, परफ्युम, डिओ, कलोन वगैरे अनेक नावे ऐकायला मिळतात. अत्तर, इयु द परफ्युम, इयु द कोलोन, आफ्टर शेव्ह, बॉडी मिस्ट, डिओड्रंट आणि इतर बऱ्याच सुंगधी द्रव्यांमुळे मनाला प्रसन्न वाटते, वातावरण सुगंधित आणि प्रफुल्लित वाटते. पण या द्रव्यामधला नेमका फरक कसा ओळखायचा आणि वापरायचे कसे?
अत्तर हे फुले, पाने, काही विशिष्ट मसाले, लाकूड या आणि अशा इतर काही नैसर्गिक घटकांपासून तयार होणारे एक नैसर्गिक, सुगंधित तेल आहे. त्या घटकांचा अर्क एका विशिष्ट पद्धतीने तयार केला जातो, त्यालाच इत्र किंवा अत्तर असे म्हणतात. भारतीय संस्कृतीत ह्याला धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. नैसर्गिकरित्या तयार केलेले अत्तर हे डिस्टिलेशन प्रक्रियेने तयार करतात किंवा विशिष्ट तेलात (उदाहरणार्थ, चंदनाचे तेल) भिजवून आणि नंतर चांगले उकळून त्याचा अर्क काढतात. हा अर्क अतिशय स्ट्राँग असतो, अगदी एक थेंबदेखील पुरेसा असतो. पूर्ण दिवस सुगंध राहतो. या अत्तराच्या जोडीने आता वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी द्रव्ये बाजारात आली आहेत. त्यांची ओळख करून घेऊ या.