

Types of Desserts
esakal
कधी बालपणीच्या आठवणी जाग्या करणारा गोड पदार्थ म्हणून, तर कधी परदेशी चवींची ओळख करून देणारा नवा अनुभव म्हणून; डिझर्टला आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असतं. काळानुसार, देशानुसार आणि खाद्यसंस्कृतीनुसार डिझर्ट्सचे अनेक प्रकार तयार झाले. या प्रकारांविषयी...
डिझर्ट म्हणजे केवळ जेवणानंतर खाल्ला जाणारा गोड पदार्थ एवढाच मर्यादित अर्थ नाही, तर वेगवेगळ्या देशांच्या संस्कृती, हवामान, जागोजागी मिळणारे पदार्थ आणि परंपरा यांमधून डिझर्ट्सचे अनेक प्रकार विकसित झाले आहेत. काही डिझर्ट्स बेक्ड असतात, काही फ्रोझन, काही दूध आणि अंड्यांच्या मिश्रणातून तयार होणारे असतात, तर काही तळून व साखरेपासून तयार होतात. ते तयार होण्याच्या पद्धतीनुसार त्यांचे हे प्रकार पडतात.