प्रतिनिधी
घटस्थापनेपासून नवरात्राचा जागर सुरू होतो. घटस्थापना म्हणजे नवरात्राचा पहिला दिवस. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी हा नवरात्राचा कालावधी. नवरात्र हा आदिशक्तीचा, अर्थात देवीचा उत्सव. आश्विन महिन्यात साजरे होणारे नवरात्र ‘शारदीय नवरात्र’ म्हणून ओळखले जाते. चैत्रातही सप्तश्रृंग गडासारख्या काही ठिकाणी देवीचे नवरात्र असते. हे चैत्री किंवा वासंतिक नवरात्र. मात्र घराघरांतून आश्विन महिन्यातच नवरात्र साजरे होते.