मराठी चित्रपटसृष्टीतील आजची आघाडीची युवा अभिनेत्री, वैदेही परशुरामी. गेली १३ वर्षे चित्रपटसृष्टीत काम करत असलेल्या वैदेहीने आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, कोकणस्थ, सिंबा, एक दोन तीन चार, झोंबिवली, संगीत मानापमान अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांमधील सशक्त अभिनयानं आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. आशयघन व्यक्तिरेखा आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निवड, हे तिचं वैशिष्ट्य आहे.