
मंगेश साखरदांडे
रिटायर होता होता गणूकाकांचा वाचनव्यवहार छापील पुस्तकं-मासिकं सोडून डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर येऊन ठेपला आणि गणपतरावांना ज्ञानाची गंगोत्री जणू नव्यानं सापडली. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि माहितीच्या महाजालातली मोजता येणार नाहीत एवढी संकेतस्थळं. जगातल्या चर्चा, वाद, क्वचित वितंडवाद आणि त्यातून स्रवणारी आजपर्यंत कधीही न समजलेली माहिती, ज्ञानविचार.