Premium|Fungi and Mushrooms : पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात बुरश्यांचे अद्भुत साम्राज्य; निसर्गातील गूढ उलगडले

Fungal Diversity in Nature : बुरशीचे जग पाण्यापासून वाळवंटापर्यंत आणि मातीपासून सजीवांच्या शरीरापर्यंत पसरलेले आहे. मंगोलियातील सायबेरियन लार्चच्या तैगा जंगलात आढळणाऱ्या रंगीबेरंगी मशरूम्समधून या अद्भुत सृष्टीची ओळख होते.
Fungal Diversity in Nature

Fungal Diversity in Nature

esakal

Updated on: 

डॉ. मंदार दातार

बुरश्यांची खरी कमाल म्हणजे त्यांनी पृथ्वीवरचा जवळजवळ प्रत्येक कोपरा व्यापला आहे. पृथ्वी नावाच्या चित्रपटात त्या नायक, नायिका, खलनायकापासून ते सहअभिनेता, चरित्र अभिनेता अशा सगळ्याच भूमिका वठवतात; पाण्यापासून ते वाळवंटापर्यंत, मातीपासून ते सजीवांच्या शरीरापर्यंत अगदी सगळीकडे...

चेंगीझ खानच्या मंगोलियाच्या उत्तर भागात खेंटी पर्वतरांगेत, सायबेरियन लार्चच्या घनदाट जंगलात उभे राहिल्यावर मला पहिल्यांदाच जाणवली एक अलौकिक शांतता. मी माझा बहुतांश वेळ विषुववृत्तीय जंगलाच्या अभ्यासात घालवला असल्यामुळे मला ही ‘तैगा’ जंगले विलक्षण वेगळी वाटली. या जंगलाचा गंधच वेगळा होता. ओल्या मातीचा, तसेच पाइन, स्प्रुस आणि लार्च यांसारख्या शंकुधारी (कॉनिफेरस) वृक्षांच्या खाली पडून कुजलेल्या पानांचा आणि त्यात मिसळलेला जमीन कुजवणाऱ्या मशरूम्सचा अनोखा मातकट वास. या वृक्षांखालून फिरताना जमिनीवर नजर टाकली, तेव्हा तिथे काही हजारांत वाढणाऱ्या मशरूम्सचे एक अनोखे विश्‍व दिसले. अगदी टाचणीच्या टोकाच्या आकारमानापासून ते चांगल्या वीतभर पसरलेल्या टोप्या असणारी, लाल-पिवळा-पांढरा-तपकिरी रंग ल्यायलेली विविधरंगी अनोळखी मशरूम्स.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com