मनोज जगताप
आव्हानात्मक परिस्थितीत जी-२० मंचातील अर्थव्यवस्थांना विषमतेने प्रभावित करणाऱ्या आर्थिक धक्क्यांचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
एकोणिसावी जी-२० शिखर परिषद ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या अध्यक्षतेखाली रिओ दी जानेरो येथे गेल्या नोव्हेंबरमध्ये पार पडली. आफ्रिकी संघ पूर्ण सदस्य म्हणून सहभागी झाल्यानंतरची ही पहिलीच शिखर परिषद होती.
‘एका न्याय्य जगाची आणि शाश्वत ग्रहाची उभारणी’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. वार्षिक आधारावरील फिरते अध्यक्षपद यंदा दक्षिण आफ्रिकेकडे असून, यापुढील परिषद जोहान्सबर्ग येथे आयोजित केली जाणार आहे.