ग्लोबल महाराष्ट्र: आनंद गानू
गर्जे मराठी ग्लोबल, एमईडीसी आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ या तीन संस्था समान ध्येय ठेवून एकत्र आल्या आणि त्यामुळेच ही कॉन्क्लेव्ह अस्तित्वात आली. ‘गर्जे मराठी’ची स्थापना २०१६मध्ये, केवळ आठ वर्षांपूर्वी झाली. स्वतःची प्रगती करताना देशाची, महाराष्ट्राची, मातृभूमी-कर्मभूमीची प्रगती करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन झाली.
केवळ आठ वर्षे वय असलेल्या आमच्या संस्थेला ६८ वर्षांच्या एमईडीसीने सोबत घेऊन समानतेचीच नव्हे, तर मोठ्या भावासारखीच वागणूक दिली. या परिषदेमध्ये जगभरातले थॉट लीडर्स सहभागी झाले. जगभरातील सर्व महाराष्ट्रीय लोकांना एका व्यासपीठावर आणणे हा आमचा प्रयत्न होता. या माध्यमातून उद्योजकतेला, उद्योजकांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांना मदत करणे हा हेतू साध्य होईल.