

Gen Z Psychology
esakal
तरुण मुलंमुली ‘का?’ हा प्रश्न विचारतात तेव्हा आपल्याला त्यातलं कुतूहल, पूर्वमाहिती, आश्चर्य, शंका यातलं काही ऐकू येत नाही. ऐकू येतो तो फक्त राग, उद्दामपणा, आव्हान. मग ते प्रत्यक्षात तसं असो वा नसो. अनंत काळापासून या वयात स्वतःचा शोध घेतला जातोय. आणि त्यासाठी असणारं मुख्य साधन म्हणजे ‘का?’ हा प्रश्न विचारणं.