

Women's Rights and Issues
esakal
लग्नानंतर स्त्रियांकडून घरकामाच्या अपेक्षादेखील भरपूर प्रमाणात असतात. त्यातच भर पडते, ती नोकरीच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसेची! घरगुती कामे आणि नोकरीच्या ठिकाणची आव्हाने अशी तारेवरची कसरत करता करता स्त्रियांच्या नाकीनऊ येतात. नव्या युगात घरकामातला पुरुषांचा सहभाग किंचित वाढलेला असला, तरी ‘इंडियास्पेंड’चा २०२४चा अहवाल सांगतो, की एकूणच शहरी महिला घरगुती कामात पुरुषांपेक्षा सुमारे १५० टक्के जास्त वेळ घालवतात.