डॉ. बाळ फोंडके
वारशाच्या बहुढंगी, बहुरंगी, चित्तचक्षूचमत्कारिक कहाण्यांनी गेली दोन वर्षं आपलं प्रबोधन करण्याबरोबरच मनोरंजनही केलं आहे. तरीही हे केवळ हिमनगाचं वरवर दिसणारं टोकच आहे हेच जाणकार सांगतील. इतर अनेक क्षेत्रांमधल्या त्यांच्या करामती अजूनही आपल्या नजरेआड राहिलेल्या आहेत. पण ‘इट्स अ स्टोरी फॉर अनदर टाइम’...
मूल जन्माला आलं की पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे ते मूल कोणासारखं दिसतंय? खरंतर हा दुसरा प्रश्न असतो. पहिला असतो, मुलगा आहे की मुलगी. कित्येक विकसित देशांमध्ये गर्भलिंगचिकित्सा पद्धतीवर बंदी नाही. त्यामुळं घरात मुलगी येणार आहे का मुलगा हे त्या बाळाच्या प्रत्यक्ष जन्माआधीच कळू शकतं. त्यामुळं आपल्याकडचा दुसरा प्रश्न तिथं पहिला होतो.