Premium|Christian Pacifism and Leo Tolstoy : जॉर्ज फॉक्सचा 'अंतरात्म्याचा प्रकाश' अन् विल्यम पेनचे अमेरिकेतील स्वप्न; एका छळाने कशी बदलली जगाची धार्मिक समीकरणे?

Christian Pacifism and Leo Tolstoy : जॉर्ज फॉक्स यांनी स्थापन केलेला 'क्वेकर' पंथ आणि त्यांचा छळाविरुद्धचा लढा हा जागतिक शांततेचा पाया ठरला. युद्धाला मुदलातच विरोध करणाऱ्या या पंथाच्या तत्त्वज्ञानाचा लिओ टॉलस्टॉय यांच्यावरही मोठा प्रभाव होता.
Christian Pacifism and Leo Tolstoy

Christian Pacifism and Leo Tolstoy

esakal

Updated on

डॉ. सदानंद मोरे

फॉक्सच्या टेस्टिमनीमुळे राजसत्तेची दृष्टी काही प्रमाणात निवळली असली, तर त्यामुळे क्वेकरांचा होणारा छळ पूर्णपणे थांबला असे म्हणता येणार नाही. कमी झाला असे मात्र म्हणता येईल. त्याचाच एक परिणाम म्हणून फॉक्सच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या विल्यम पेनने आपल्या वडिलांना राजसत्तेच्या कर्जापासून मुक्त करायचा जो प्रस्ताववजा उपाय सुचवला तो दुसऱ्या चार्ल्स राजाने मान्य केला, ज्यानुसार पेन अमेरिकेत जाऊन तेथील एका विस्तीर्ण बेटाचा कारभार पाहणार होता. प्रशासन करणार होता.

युद्ध नावाच्या हिंसक प्रकाराला मुदलातच विरोध करणारा एकमेव पंथ म्हणून केवळ क्वेकर पंथाचेच नाव घ्यावे लागते. लिओ टॉलस्टॉय यांनी ख्रिस्ती धर्माची जी मांडणी केली आहे त्यावरून असे निष्पन्न होते, की त्यांच्या मते येशूच्या शिकवणीशी पूर्णपणे सुसंगत असलेला व म्हणूनच ज्याला ख्रिस्ती धर्माचे खरे किंवा अस्सल रूप मानता येईल असा जर कोणता पंथ असेल तर तो क्वेकरच. या आधारावरच तर टॉलस्टॉयची युद्धखोर ख्रिस्ती राष्ट्रांवरील टीका आधारित आहे. War and Peace या कादंबरीमुळे जगप्रसिद्ध झालेल्या या लेखकाचा ख्रिस्ती धर्मविषयक दृष्टिकोन The Kingdom of God is within You या पुस्तकात स्पष्ट झाला आहे. ते क्वेकर पंथाचे तत्त्वज्ञान सांगते एवढे सांगितले तरी पुरेसे ठरते. साहजिकच विश्वाला लागलेले शांतीचे आर्त समजून घ्यायचे असेल तर क्वेकरांना टाळून पुढे जाताच येणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com