

Fashion Capitals
esakal
केतकी उत्पात
फॅशन ही केवळ ट्रेंडची शर्यत नाही, तर ती शहराची ओळख, देशाची अर्थव्यवस्था आणि लोकांची मानसिकता घडवणारी ताकद आहे. एखादे शहर जेव्हा ‘फॅशन कॅपिटल’ म्हणून उभे राहते, तेव्हा ते केवळ कपडे तयार करत नाही, ते स्वप्ने, रोजगार आणि जागतिक संवाद निर्माण करते. हॉ लिवूडचा एक चित्रपट पाहत होते. चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात एक तरुण मुलगी आरशासमोर उभी आहे. तिने घातलेला ड्रेस महाग नाही, पण तिच्या डोळ्यांत स्वप्न आहे. न्यूयॉर्कच्या एका मोठ्या फॅशन मॅगझिनमध्ये काम करण्याचे स्वप्न. द डेव्हिल वेअर्स प्राडा हा तो चित्रपट! हा चित्रपट आपल्याला फक्त ग्लॅमर दाखवत नाही, तर तो सांगतो फॅशन म्हणजे सत्ता, मेहनत, स्पर्धा आणि ओळख.