ग्लोबल महाराष्ट्र : हर्षवर्धन पाटील
भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. क्षमता आणि संधींनी भरलेली ही भूमी आहे. भारतीय उद्योगासाठी हा एक निर्णायक कालावधी आहे. जग आपल्याकडे कौतुकाने पाहत आहे.
पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा सहभाग असलेली पहिली ग्लोबल आंत्रप्रेन्युअर कॉन्क्लेव्ह २०२५ आयोजित करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा अभिमान आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पिंपरी-चिंचवड परिसराला समृद्ध औद्योगिक केंद्र म्हणून ओळख मिळाली.