Premium|Share Market Crash 2026 : शेअर बाजारात बिबट्या-साळींदर संघर्ष; अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम

Global Economy and War : इराण-अमेरिका संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी विळख्यात सापडली असून जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. वाढते इंधन दर आणि रुपयाची घसरण यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी मंदी आली असून गुंतवणूकदारांनी आता संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.
Share Market Crash 2026

Share Market Crash 2026

esakal

Updated on

भूषण महाजन

रशिया-युक्रेन युद्धात किंवा इस्राईल-हमास युद्धात बाजार पडले, पण कमी-अधिक वेळात सावरले, काण त्या युद्धांचा परिणाम जोखता आला. अमेरिकेने व इस्राईलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला; तो धक्का बाजाराने पचवला. पण खरा धक्का होर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याचा होता. ते इराणने केल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीच्या नाड्या आवळल्या गेल्या. कंटेनर तुटवडा, विमा खर्च वाढणे व वेळ लागणे हे अपेक्षित नव्हते. भारतीय बाजार प्रमाणाबाहेर घसरले ते यामुळे...

बिबट्या आणि साळींदर यांच्यातील संघर्ष ही निसर्गातील एक अतिशय थरारक आणि धोकादायक घटना मानली जाते. बिबट्या हा एक अत्यंत चपळ शिकारी आहे, तर साळींदराच्या अंगावर स्वतःच्या संरक्षणासाठी अणकुचीदार काट्यांचे कवच असते. साळींदराचे मांस लुसलुशीत असल्यामुळे बिबट्याला त्याच्या शिकारीचा मोह पडतो. एक पंजा मारला तर साळींदर अर्धमेले होते हे जरी खरे असले, तरी जेव्हा बिबट्या हल्ला करतो, तेव्हा साळींदर आपले शरीर फुगवून काटे उभे करते. जर बिबट्याने पंजा मारला किंवा तोंड लावले, तर हे काटे त्याच्या शरीरात, विशेषतः चेहरा, डोळे आणि पायात आतपर्यंत घुसतात आणि अत्यंत जीवघेणे ठरू शकतात. नाकातोंडात गेलेले काटे बिबट्याला पुरते नामोहरम करून टाकतात. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे सध्या सुरू असलेला अमेरिका-इराण संघर्ष. इराणवर हल्ला करून त्यांचे वरिष्ठ नेतृत्व अमेरिकेने कापून काढले खरे, पण ते राष्ट्र कडवे असल्यामुळे तिथे नवे नेतृत्व तयार होईल आणि ते हार मानणार नाही. तात्पर्य असे, की या युद्धाने आज साऱ्या जगालाच वेठीस धरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com