

Global Warming
esakal
‘आधी केले मग सांगितले’, असा आपल्याकडे वाक्प्रचार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक धोरणे आखण्यासाठी आणि अमलात आणण्यासाठी सरकारवर पुरेसा दबाव आणायचा असल्यास जनतेने स्वतः शाश्वत जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे. शाश्वत जीवनशैली म्हणजे अशी जीवनपद्धती, जी आजच्या गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांना धक्का न लावता पर्यावरणाचे संरक्षण करते.