प्रसाद नामजोशी
नव्वदचं दशक उजाडलं होतं तेव्हा जगभरात अनेक घटना घडत होत्या. भारतासाठी महत्त्वाचं म्हणजे जागतिकीकरणाचे दरवाजे उघडले गेले होते. त्याच दशकात २६ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत युनियन बरखास्त होऊन तिचे रशियासकट एकूण पंधरा तुकडे झाले होते. १९८९मध्ये लायसन्स टू किल हा बॉन्डपट येऊन गेला होता आणि जेम्स बॉन्डचं काम करणारा टिमोथी डाल्टन याचा निर्मात्यांबरोबरचा करार संपुष्टात आला होता. बॉन्डच्या हक्कांसाठी पुढची पाच वर्षं इऑन फिल्म्सला कोर्टकचेरीत घालवावी लागली.