Premium|Gond Art : गोंड चित्रकलेत निसर्गपूजेची परंपरा; १४०० वर्षांचा समृद्ध इतिहास

Gond Art and Tribal Culture : गोंड आदिवासींच्या चित्रकलेत निसर्ग, पर्वत, नदी, झाडं आणि जमिनीला विशेष स्थान आहे. सुमारे १४०० वर्षांची परंपरा असलेली ही कला त्यांच्या श्रद्धा आणि संस्कृतीशी जोडलेली आहे.
Gond Art and Tribal Culture

Gond Art and Tribal Culture

esakal

Updated on

वर्षा गजेंद्रगडकर

चांगलं चित्र घरात भरभराट आणि भाग्य आणतं, अशी गोंड आदिवासींची श्रद्धा आहे. त्यामुळेच गोंडांमध्ये भिंतींवर सुंदर चित्र काढण्याची प्रथा होती. त्यांच्या धार्मिक व्यवस्थेत पर्वत, खडक, जमीन, नदी, झाड अशा निसर्गातल्या सगळ्या गोष्टी पवित्र मानल्या जातात. त्यांच्या मते, या प्रत्येक ठिकाणी चैतन्याचा निवास असतो. म्हणून गोंड चित्रकार अत्यंत आपुलकीनं आणि आदरपूर्वक हे घटक चित्रात उतरवतात.

भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे आणि या देशाच्या विविध भागांत स्थिरावलेल्या निरनिराळ्या आदिवासी समूहांनी ही संस्कृती अधिक समृद्ध केली आहे. देशभरात ७००हून जास्त आदिवासी समुदाय आहेत. यामध्ये भिल्ल, गोंड, संथाल, मुंडा, वारली हे ठळक समुदाय आहेत. गोंड समुदाय मुख्यतः मध्य प्रदेशात स्थिरावला आहे. अर्थात महाराष्ट्र, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही गोंडांचं अस्तित्व आहे. या समुदायाला जवळपास १४०० वर्षांचा इतिहास आहे आणि त्याची कलापरंपराही तेवढीच प्राचीन आहे.

गोंड हा भारतातला सर्वात मोठा आदिवासी समुदाय आहे. हा समुदाय द्रविडवंशीय आहे. त्यामुळे आर्यपूर्व काळापासून त्यांच्या अस्तित्वाचा मागोवा घेता येतो. गोंड हा शब्द मुळात द्रविड संस्कृतीतल्या ‘कोंड’ या शब्दावरून आला आहे. ‘कोंड’ म्हणजे हिरवा पर्वत. हे आदिवासी स्वतःला ‘कोई’ किंवा ‘कोइतुआर’ म्हणायचे, पण ते जंगलांनी वेढलेल्या डोंगराळ भागात राहत असल्यामुळे इतर लोक त्यांना ‘कोंड’ म्हणत. त्यांचं मुख्य वास्तव्य होतं अमरकंटक पर्वतरांगांमधल्या विंध्य, सातपुडा आणि मांडला पर्वतांवरच्या घनदाट जंगलात. त्यांचं मध्य भारतातलं राज्य ‘गोंडवन’ म्हणून ओळखलं जाई. तेराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत हा आदिवासी समुदाय आपलं सामर्थ्य टिकवून होता. आइन-ए-अकबरीमधल्या उल्लेखानुसार उत्तर, मध्य आणि दक्षिण भागात त्यांची वेगवेगळी चार राज्यं होती. पण तेराव्या शतकापासून वारसाहक्क आणि अंतर्गत कलहांमुळे हळूहळू गोंड सत्ता लयाला गेली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com