

Graham Arnold Iraq Coach Success
esakal
अमेरिका-इस्राईलच्या इराणवरील युद्धाची झळ शेजारील इराकलाही बसली. बगदाद येथील वातावरण तंग होते. विविध भागांत विखुरलेल्या खेळाडूंना बोलिव्हियाविरुद्धच्या लढतीसाठी एकसंध करणे कठीण ठरत असताना अर्नोल्ड यांची दूरदृष्टी निर्णायक ठरली.
ऑस्ट्रेलियाचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आणि निवृत्तीनंतर प्रशिक्षणात यशस्वी ठरलेले ग्रॅहम अर्नोल्ड यांनी गेल्या वर्षी इराकच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले. त्यावेळी पश्चिम आशियातील या देशाचा २०२६मधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील प्रवेश निश्चित नव्हता. ‘द लायन्स ऑफ मेसोपोटेमिया’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या संघाचे भवितव्य अनिश्चित होते. ‘अर्नी’ या नावाने परिचित असलेल्या या ऑसी फुटबॉल प्रशिक्षकाने गेल्या वर्षी मे महिन्यात इराकच्या राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. इराकने येत्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या फुटबॉलमधील सर्वांत मोठ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी तब्बल ४० वर्षांनंतर पात्रता मिळविली.