

Grand Canyon Travel
esakal
प्रभाकर कोशे
जसजसे विमान ग्रॅंड कॅन्यन परिसरातून उड्डाण करू लागले, तसतसे ग्रॅंड कॅन्यनचे विशाल रूप दिसू लागले. कोलोराडो नदीचे लांबच लांब विस्तीर्ण पात्र, बाजूला ग्रॅंड कॅन्यनचे उंच उंच ताशीव कडे... अतिशय रमणीय असे हे दृश्य आम्ही डोळ्यात व कॅमेऱ्यात साठवून घेत होतो. त्याच वेळी काही छोटी हेलिकॉप्टर्स ग्रॅंड कॅन्यनच्या जवळून उड्डाण करत होती.
काही वर्षांपूर्वी ग्रँड कॅन्यनला भेट देण्याचा योग आला. तिथे जाण्यासाठी आधी सिएटलहून विमानाने ॲरिझोना राज्यातील फिनिक्स शहरात गेलो आणि तेथून भाड्याने कार घेऊन पुढील प्रवास करायचा होता. संध्याकाळी साडेसात वाजता निघालो. दिवसा उष्ण असले, तरी हवामानाच्या अंदाजाप्रमाणे रात्रीचे तपमान शून्य अंशाखाली जाणार होते. त्यामुळे जेवढे लवकर पोहोचता येईल तेवढे चांगले होते. प्रवासाच्या एका टप्प्यावर ‘ग्रॅंड कॅन्यन साठ मैल’ असा फलक दिसला. त्याप्रमाणे आम्ही उजवीकडे वळलो. पुढील संपूर्ण प्रवास जंगलातून होता. हळूहळू वाहनांची संख्या कमी होत गेली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल, त्यामधून गेलेल्या लांबलचक रस्त्यावरून आमची गाडी चालली होती. ठरल्याप्रमाणे अकरा वाजता हॉटेलवर पोहोचू असा अंदाज होता, पण...