Premium|True Love Story : "प्रेम म्हणजे संकटात हात न सोडणं...": एका वृद्धाच्या आठवणींची गोष्ट

A Grandfather’s Unforgettable First Love : वसंतरावांनी नातवाला सांगितलेल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीतून प्रेमाचा खरा अर्थ उलगडतो; तरुणपणीची ओढ, संसारातील कष्ट, स्वीकार आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या जोडीदाराचे महत्त्व ही कथा अधोरेखित करते.
A Grandfather’s Unforgettable First Love

A Grandfather’s Unforgettable First Love

esakal

Updated on: 

पार्थ पतंगे

वसंतरावांनी अथर्वच्या डोक्यावरून हात फिरवला, ते म्हणाले, ‘‘हो रे... पहिल्यांदा हृदय मुक्तासाठी धडधडलं होतं. पण आयुष्यभर ते धडधडत राहिलं, कारण शैलजा सोबत होती.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘तरुणपणी आपल्याला प्रेम म्हणजे हातात हात धरणं वाटतं. नंतर कळतं, प्रेम म्हणजे संकटात हात न सोडणं. तरुणपणी प्रेम डोळ्यांत दिसतं, संसारात ते कष्टांत दिसतं...’’

काही प्रश्न असे असतात, जे आयुष्याच्या बंद कपाटात ठेवलेल्या आठवणींची कडी नकळत उघडून टाकतात.

खिडकीबाहेर पाऊस कोसळत होता. छपरावर पडणाऱ्या थेंबांचा आवाज, स्वयंपाकघरात शिट्टी वाजवणारा कुकर, टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्या आणि हॉलमध्ये मोबाईलवर गेम खेळणाऱ्या अथर्वचा गोंधळ... सगळं नेहमीसारखंच होतं.

‘‘आजोबा...’’ अथर्वनं मोबाईलवरून नजर न हटवता अचानक विचारलं, ‘‘तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रेमकथा कोणती?’’

वर्तमानपत्र वाचणारे वसंतराव पान उलटता उलटता थांबले. त्यांनी हळूच वर्तमानपत्र खाली केलं. चष्म्याच्या काचेपलीकडून त्यांची नजर कुठेतरी दूर निघून गेली; जिथं ना हा पाऊस होता, ना हा टीव्ही होता, ना मोबाईल... फक्त काही आठवणी होत्या; काळानं सुरकुतलेल्या, पण विस्मृतीत पुसल्या न गेलेल्या आठवणी. अथर्वची आई हसत म्हणाली, ‘‘बाबा, सांगा ना... आम्हालाही ऐकायचंय.’’

वसंतराव हलकेच हसले, ‘‘प्रेमकथा?’’

‘‘हो ना! आजकाल सगळ्यांची असते... तुमची नव्हती का?’’

क्षणभर त्यांनी खिडकीबाहेर पाहिलं. पावसाचा एक थेंब काचेतून खाली सरकत होता, अगदी त्यांच्या आठवणींसारखा. ते शांत आवाजात म्हणाले ‘‘प्रेम तर केलं होतं रे...’’ घरात क्षणभर शांतता पसरली,

‘‘...पण पहिलं प्रेम जिच्यावर केलं ती माझी बायको नव्हती.’’

सूनबाईंच्या हातातून डाव निसटला. अविनाशनं नकळत टीव्हीचा आवाज बंद केला. अथर्वनं गेम थांबवला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न उमटला, ‘मग आजी...?’ वसंतराव हसले. ते हसू अपराधी नव्हतं, ते हसू आयुष्य समजलेल्या माणसाचं होतं. ‘‘तुम्हाला वाटत असेल, ही एखादी अधुरी प्रेमकथा असेल,’’ ते म्हणाले, ‘‘पण नाही, ही कथा प्रेमापेक्षा जास्त माणसांची आहे, आठवणींपेक्षा जास्त स्वीकाराची आहे आणि शेवटापेक्षा जास्त सुरुवातीची आहे.’’ त्यांनी डोळे मिटले. पावसाचा आवाज हळूहळू विरत गेला.

***

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com