

Gut Microbiome
esakal
गट हेल्थ आणि मायक्रोबायोम हे केवळ पचनापुरते मर्यादित नसून ते आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा पाया आहेत. आपल्या शरीराचे रक्षण करणाऱ्या या कोट्यवधी लहान मित्रांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. आधुनिक जीवनशैलीच्या प्रवाहात पाश्चिमात्य आहाराचे अनुकरण करण्याऐवजी आपल्या पारंपरिक सकस अन्नाकडे परत जाणे, हाच प्रभावी उपाय आहे.
गेल्या काही वर्षांत वैद्यकीय विज्ञानात एक अतिशय क्रांतिकारी संशोधन समोर आले आहे, ते म्हणजे आपले आरोग्य केवळ आपण काय खातो यावर नाही, तर आपले आतडे ते अन्न कसे पचवते यावर अवलंबून असते. आपल्या अन्ननलिकेमध्ये कोट्यवधी सूक्ष्मजीव राहतात, ज्यांना वैज्ञानिक भाषेत ‘गट मायक्रोबायोम’ म्हटले जाते. हे सूक्ष्मजीव केवळ अन्न पचवण्याचे काम करत नाहीत, तर आपली प्रतिकारशक्ती, चयापचय क्रिया आणि चक्क आपले मानसिक आरोग्यदेखील नियंत्रित करतात. म्हणूनच, आजकाल आतड्यांच्या आरोग्याला म्हणजेच ‘गट हेल्थ’ला जागतिक स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या अद्भुत जगाची आणि आतड्यांच्या आरोग्याची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.