Premium|Role of Dopamine and Serotonin in happiness : आनंदी राहण्यासाठी डोपामाइन आणि सेरोटोनिनची भूमिका; हॅपी हार्मोन्सचा प्रभाव

Science of happiness and mental health : आनंद हा केवळ भावना नसून डोपामाइन, सेराटोनिन सारख्या हार्मोन्सचा खेळ आहे; सात्विक जीवनशैली, व्यायाम आणि कृतज्ञतेच्या जोडीने नैसर्गिकरीत्या आनंदी राहण्याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अमोल सप्तर्षि यांनी या लेखातून दिले आहे.
Role of Dopamine and Serotonin in happiness

Role of Dopamine and Serotonin in happiness

esakal

Updated on

डॉ. अमोल सप्तर्षि

दुःख नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाला काहीतरी दुःख, खंत, टोचणी किंवा बोच असतेच. याचा अर्थ आपल्याकडे हॅपी हार्मोन्स कमी आहेत किंवा अजिबातच नाहीत असा होत नाही. तसंच काही वाटलं, तर थोडा व्यायाम करावा, चविष्ट अन्न खावं, मित्रांचा सहवास अनुभवावा, थोडं गॉसिप करावं. या सगळ्यामुळे आपण आनंदी होतो.

आनंदी राहावं असं प्रत्येकाला वाटतं. या ना त्या प्रकारे आनंदी राहण्यासाठी माणूस सतत प्रयत्नशील असतो. सुरुवातीला आनंदाच्या कल्पना अगदी सीमित असतात, नंतर त्या अमर्याद व्हायला लागतात. आनंदाच्या टप्प्यांचा विचार करताना आपल्याला समाजामध्ये अल्पसंतुष्ट, हवं ते सर्व असूनही दुःखी असणारे अशा भिन्न स्तराच्या व प्रकारच्या व्यक्ती दिसतात. विशेष म्हणजे या सर्वांमध्ये कोण कशामुळे सुखावेल किंवा दुखावेल हे सांगणंही अवघड आहे. मानवी स्वभावानुसार दुःखी होण्यासाठी अगदी दुसऱ्याची बाग आपल्या बागेपेक्षा जास्त सुंदर आहे इथपासून, ते मी ज्या लेनमध्ये गाडी चालवतोय त्यापेक्षा पलीकडच्या लेनमध्ये कमी खड्डे आहेत इतकीशी भावनाही पुरेशी असते. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आनंदी नसलो तरी मी दुसऱ्यांपेक्षा जास्त आनंदी कसा आहे, हे दाखवण्याची जणू स्पर्धाच पाहायला मिळते. मी काय मिळवलंय इथपासून मी काय खातोय, मी कुठं फिरतोय या सगळ्याचे फोटो, व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्या पोस्ट्सना मिळणाऱ्या लाइक्स, कॉमेंट्समधून आनंद शोधण्याचा प्रयत्न होतो. हा पूर्णतः स्वतंत्र लेखाचा विषय होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com