Premium|Perception of happiness across generations : अभावातून मिळणारा आनंद की झटपट मिळणारे सुख? नव्वदच्या दशकातील 'वेटिंग' आणि आजचे 'इन्स्टंट' जगणे

Subjective well-being and life satisfaction : आनंद हा व्यक्तीसापेक्ष असून तो प्रत्येकाच्या वयानुसार आणि अनुभवानुसार बदलतो; पिढ्यानपिढ्यांची मते जाणून घेत आनंदाचे रोपटे मनाच्या कोपऱ्यात कौशल्याने कसे रुजवायचे, याचे सुंदर मार्गदर्शन अमृता देसर्डा यांनी या लेखातून केले आहे.
Subjective well-being and life satisfaction

Subjective well-being and life satisfaction

esakal

Updated on

अमृता देसर्डा

आनंद व्यक्तीसापेक्ष आहे. तो मानवी मन, घडून गेलेल्या घटना आणि माणसाच्या विचारप्रक्रियेवर अवलंबून असतो. आनंदी राहणं ही मनाची, शरीराची अनोखी अशी अवस्था आहे, जी मोठ्या कौशल्यानं जपावी आणि रुजवावी लागते. आपण एखाद्या रोपाचं जसं संगोपन करतो, तसं या आनंदरूपी बीजाचं उत्तम संगोपन करून ते वाढवायला हवं!

‘‘हल्लीची पिढी खूप कॅज्युअल आहे. त्यांना सगळं मिळतं, त्यांच्या जगण्यात कसलाच अभाव नसतो; त्यांना काय समजणार खरा आनंद काय असतो?’’ एक सत्तरी ओलांडलेल्या आज्जी बागेत बसून त्यांच्या मैत्रिणीशी बोलत असताना हा संवाद कानावर पडला.

मनात असंख्य प्रश्न दाटून आले. खरंच हल्लीची पिढी अशी आहे? त्यांना त्यांच्या आयुष्यात कुठलाच अभाव अनुभवायला मिळाला नसेल? खरा आनंद काय हे त्यांना माहिती नसेल? तो कशात आहे हे त्यांना सांगता येईल? असे प्रश्न मनात आले आणि मी त्यांची उत्तरं शोधण्याच्या निमित्तानं लोकांशी बोलायचं ठरवलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com