Premium|Healthy Aging : लाइफस्पॅनपेक्षा ‘हेल्थस्पॅन’ वाढवा!

Healthspan vs Lifespan : दीर्घायुष्यापेक्षा निरोगी, स्वावलंबी आणि उत्साही वृद्धत्व अधिक महत्त्वाचे ठरत असून ‘हेल्थस्पॅन’ संकल्पना योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीद्वारे आयुष्याची गुणवत्ता वाढवण्यावर भर देते.
Healthspan vs Lifespan

Healthspan vs Lifespan

esakal

Updated on

डॉ. प्रणिता अशोक

दीर्घायुष्य लाभणे किंवा जास्त वर्षे जगणे, ही काही प्रमाणात निसर्गाची किंवा जनुकीय देणगी असू शकते. परंतु, ‘निरोगी वृद्धत्व’ (हेल्थस्पॅन) ही पूर्णपणे आपली स्वतःची निवड असते. म्हातारपण हे परावलंबित्वाचे, आजारांचे नसावे, तर ते अनुभवांचे आणि समृद्धीचे असावे. आधुनिक पोषणशास्त्राचे ध्येय केवळ आयुष्यातील वर्षे वाढवणे नाही, तर या वाढलेल्या वर्षांमध्ये नवचैतन्य, उत्साह आणि निरोगी आयुष्य भरणे हे आहे.

आपण किती वर्षे जगतो, यापेक्षा ती वर्षे कशी जगतो हे जास्त महत्त्वाचे आहे. आज वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाचे सरासरी आयुर्मान वाढवणे नक्कीच सोपे झाले आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, की ही वाढलेली वर्षे आपण कशी जगतोय? वाढलेल्या आयुष्याबरोबरच म्हातारपणातील परावलंबित्व, अंथरुणाला खिळणे, औषधांचा वाढता डोस आणि गंभीर आजारांचा सामना हेही वाढले आहे.

याच पार्श्‍वभूमीवर, जागतिक स्तरावर आहारतज्ज्ञ, डॉक्टर आणि दीर्घायुष्याचे संशोधक (लाँजिव्‍हिटी सायंटिस्ट) एका नव्या संकल्पनेवर भर देत आहेत ती म्हणजे ‘हेल्थस्पॅन’. लाइफस्पॅन म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतची एकूण वर्षे, तर हेल्थस्पॅन म्हणजे आयुष्यातील अशी वर्षे, जी आपण कोणत्याही गंभीर आजाराशिवाय, निरोगी, गतिमान आणि मानसिकदृष्ट्या कार्यक्षमतेने जगतो. थोडक्यात सांगायचे, तर केवळ दीर्घायुषी होणे पुरेसे नाही, तर म्हातारपणातही ताठ मानेने, उत्साहाने आणि स्वावलंबनाने जगता आले पाहिजे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com